चंद्रपूर जिल्हा घडामोडी

डि. एल. एड. रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी

चंद्रपूर : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका (डी.ईआय. ईडी.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहे.  प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दिनांक 11 जानेवारी ते 14 जानेवारी 2021 रोजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे. 11 ते 15 जानेवारी 2021 रोजी पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे. 11 ते 16 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लॉगीन मधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करून स्वत:चे प्रवेशपत्र काढून घेणे. 11 ते 20 जानेवारी 2021 रोजी प्राचार्य, संबंधीत अध्यापक विद्यालय यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांची पडताळणी करून स्वत:चे लॉगीन मधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲडमिट करून घेणे.

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून मंजूर करून घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन मंजूर केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रीयेत समावेश होणार नाही. प्रवेश प्रक्रियेच्या द्वितीय विशेष फेरीनंतर (डी. ईआय. ईडी.) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी कळविले असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले यांनी कळविले आहे

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!