गोंडपीपरी:- तालुक्यातील धाबा मार्गावर धामनपेट जंगल परिसरात अस्वल आपल्या दोन पिल्या सह जगलं परिसरात दिसून आली.
धाबा वन परिक्षेत्रात वाघ, हरीण, अस्वल, रानडुक्कर, चितळसह अन्य वन्यप्राणी आहेत.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलातून कधी शेतशिवारात, कधी गावात तर कधी मार्गावर दिसून येतात. अस्वल आपल्या पिल्यासोबत पाण्याच्या शोधात जंगल परिसरात भटकंत असावी असा अंदाज लावला जात आहे.

या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असल्याने अधून-मधून वन्यजीव व मानव यांचा संघर्ष पाहायला मिळत असतो. चार महिन्यांपूर्वी वाघाच्या हल्ह्यात डोंगरगाव टेकडीवर एका शेतकर्यांच्या बकऱ्या वाघाने ठार केल्या तर डोंगरगाव येथील एका शेतकऱ्यांची गाय वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना घडली होती.धाबा , डोंगरगाव, गोज्जोली ,धामनपेठ सह आजूबाजूच्या इतर गावपरिसरात वन्यजीव मुक्तपणे संचार करीत असतात.अश्यातच गोंडपीपरी धाबा मार्गावर धामनपेठ जंगल परिसरात
अचानकपणे अस्वलीने दोन पिल्यांसह दर्शन दिल्याने या परिसरात वन्यजीवांचा चा वावर वाढला असल्याचे दिसून येत आहे.
Add Comment