भद्रावती – चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधी योजने अंतर्गत भद्रावती तालुक्यातील महिला बचत गटांना दरीपंजीचे व फॉगिंग मशीन चे वाटप करण्यात आले. या वेळी जि.प.सदस्या अर्चना जिवतोडे, जि.प.सदस्य यशवंत वाघ,प्रवीण भाऊ सूर, प स सभापती प्रावीनभाऊ ठेंगणे, संवर्ग विकास अधिकारी डाॅ.मंगेशजी आरेवार, बोबडे साहेब, विस्तार अधिकारी कापकर साहेब, खोब्रागडे मॅडम , सर्व महिला बचत गटातील अध्यक्ष/सचिव ,सरपंच व ग्रामसेवक आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटांनी दरीपंजीचा वापर महिला सभा व महिलांचे कार्यक्रम यासाठी करुन बचत गट सक्षम करावे असे आवाहन याप्रसंगी केले. यावेळी तालुक्यातील 50 महिला बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते दरीपंजी व फॉगिंग मशीन चे वाटप करण्यात आले.
Add Comment