अमरदिप लोखंडे
आवळगाव
ब्रम्हपूरी : – पोटाला मारा आणि लाॅकडाऊन चे पालन करा.
गोरगरिबांच्या डोळ्यात पाणी पाहून मन हेलावून जाणाऱ्या व्यक्ती, संस्था ,कार्यालय आजही जिवंत आहेत याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ग्रामपंचायत
कार्यालय वांद्रा येथील नवनियुक्त सरपंच तथा सदस्य.
देशाच्या काही भागात, महाराष्ट्र राज्यात ,चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे शासनाने गोरगरीब जनता बिमारीने मरु नये या साठी लाकडाॅऊन घोषित केले. त्यामुळे हातावर पोट भरणारे मजूर, कामगार, छोटे दुकानदार रोजच्या रोजी-रोटी पासून दुरावल्या मुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे .याची दखल घेत ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील ग्राम ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच व सदस्य यांनी वांद्रा येथील गरीब दिव्यांग व्यक्ती व महिलां यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यात गहू ,तांदूळ ,मीठ,तिखट,आटा, तेल ,साखर ,डाळ , गुळ,हळद, साबून व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ग्रामपंचायत सरपंच श्री महादेव मडावी व उपसरपंच वार्ताहर गुरुदेव वाघरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पा.सातपुते, लोमेश गेडाम, ताराबाई कांबळी,सविता ठाकरे,कविता पाल,वनिता मेश्राम, अंजली राऊत तथा ग्रामसेवक आर.एच .राऊत व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गावातील 15 गरजू दिव्यांग दिव्यांग स्त्री-पुरुषांना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वितरण करण्यात आले. अन्नधान्याचे पाकिट घेताना दिव्यांग गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.
ग्रामपंचायत वांद्रा तर्फे दिव्यांगांना जीवनावश्यक किट च्या वस्तूंचे वाटप…


Add Comment