चंद्रपूर जिल्हा घडामोडी विदर्भ

दिवाळीच्या सणात गरिबांच्या घरी प्रकाश टाका रेशन दुकानात अत्यल्प दरात खाद्य तेल, चण्याची, तुळीची डाळ व केरोसीन उपलब्ध करा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी

चंद्रपूर : मागील अनेक महिन्यापासून कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल होत असून बाजारपेठा व व्यापाऱ्यांचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे. काही दिवसावरच दिवाळी सारखा सण असल्यामुळे मजूर वर्ग व सामान्य कुटुंबातील गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. त्यांची दिवाळी अंधारात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यांचा घरात प्रकाश टाकण्याकरिता रेशन दुकानात अत्यल्प दरात खाद्य तेल,तुरीची , चण्याची डाळ व केरोसीन उपलब्ध करून देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

ग्रामीण भागात लोडशेडिंग व विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित झाला तर केरोसीन तेलाचा दिवा लावण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरु आहे. ग्रामीण भागात विद्युत खंडित झाल्यावर तीन ते चार किंवा त्यापेक्षा अधिक तास विद्युत पुरवठा करण्यास वेळ लागतो. चंद्रपूर, भद्रावती, राजुरा मतदार संघात हिंस्त्र व वन्य प्राण्यांनी हैदोस मांडलेला आहे. त्यामुळे अंधारात दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे त्यांना हा वेगळा धोका आहे. मा. उच्च न्यायालयाचा व शासनाचा निर्णया प्रमाणे शिधापत्रिका धारकांकडे गॅस जोडणी नाही. त्यांना केरोसीन मिळणे बंधनकारक आहे. परंतु विना गॅसधारक शिधापत्रिका धारकांना केरोसीन मिळणे बंद झाले आहे. गॅस धारकांना त्यांचे गॅस सिलेंडर संपल्यावर शहरी भागात कमीत कमी २ दिवसानंतर व ग्रामीण भागात कमीत कमी आठ दिवस व अतिदुर्गम भागात १६ दिवसानंतर सिलेंडर मिळते. या दरम्यान त्या गॅस धारकांनी स्वयंपाक करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो.

आपल्या भागामध्ये मजूर व सामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे. मागील अनेक महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाच्या गाडा चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापूढे पडला आहे. सामान्य कुटुंबातील गृहिणीचे दैनंदिन व दिवाळीचे नियोजन चुकले आहे. दिवाळीच्या सन काही दिवसावर असताना आता त्यांचा घरात प्रकाश टाकण्यासाठी अल्प दरात खाद्य तेल, तुरीची, चण्याची डाळ, व केरोसीन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

—————————————————————————————————————————————

मी स्वतः एक गृहिणी आहे. मी हि परिस्थिती स्वतः अनुभवली आहे. मला गरिबीची जाणीव आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सन प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश घेऊन येईल याकरिता मी प्रयत्न करीत राहणार आहे.

– आमदार प्रतिभाताई धानोरकर

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!