चंद्रपूर शहरातील अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या गाडी मधून 1 लक्ष 24 हजार चारशे चा मुद्देमाल जप्त करण्यात दुर्गापूर पोलिसांना यश आले आहे.
सदर कारवाई दुर्गापूर पोलिसांनी 22 मे रोजी दुर्गापूर वॉर्ड क्र.4 मध्ये केली.अवैध दारूविक्रेत्यांवर पाळत ठेवणाऱ्या एका पोलीस पथकाला महिती मिळताच. पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे ह्याच्या मार्गद्शनाखाली दारू बंद रेड करण्यात आली.ह्यात पोलिसांनी 50 हजार रुपये किंमतीची मोपेड, 60 हजार रुपये किंमतीची देशी दारु व मकॅडोवेल न 1 चे निपा किंमत 14400 रु.असा एकुण 1 लक्ष 24 हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामधे दोन आरोपींना अटक करण्यात आली.आरोपी 1) प्रकाश विजय बर्वेकर 2) हृतिक प्रमोद चिंचोले दोन्ही रा.दुर्गापूर ह्यांना अटक करून त्यांच्या वर अप. क्र.120/21 कलम 65(आ),(ई),83 मदका अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही दुर्गापूर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने,पो.हवा.सुनिल गोरकर नापोशी उमेश वाघमारे, मनोहर जाधव,सूरज लाटकर, व संतोष आडे ह्यांनी यशस्वी रित्या पार पाडली.पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक करीत आहे.
दुर्गापूर पोलिसांची कारवाई…देशी व विदेशी दारुसह 1 लक्ष 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…


Add Comment