दुर्गापूर पोलिसांच्या कार्यवाही ने धास्तावले अवैध दारू विक्रेते…
May 23, 2021
75 Views
1 Min Read
देशी विदेशी सोबत गावठी दारू विक्रेतेन मध्ये भीती चे वातावरण..
चंद्रपूर शहरातील व ग्रामीण भागात सध्या चालू असलेल्या लॉक डाउन मुळे अवैध्य दारू विक्रीला उथान आले असताना व अनेक अवैध्य दारू विक्रेते सरसावले असताना ह्याचा बीमोड करण्यास साठी दुर्गापूर पोलिसांनी कंबर कसली आहे. गत चौवीस तासात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही करीत अवैध्य दारू विक्रेत्यांवर चांगलीच चपराक बसविण्यात दुर्गापूर पोलिसांना यश आले आहे.
दुर्गापूर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ह्याच्या मार्गदर्शन ना खाली काल दि.22 मे ला दारु बंद रेड वरवट शेत शिवारात करण्यात आली.त्यात मोहा दारू 50 लिटर किंमत 25000 रु.,मोह सळवा 800 ली.किंमत 1,60,000 रु असा एकुण 1,60,000 रु.चे मुदेमाला सोबत दोन आरोपी 1)रितेश मोरेश्वर निमगडे, रा. वरवट व 2)बापूराव रायपुरे ह्यांच्या वर अप. क्र./21 65(फ)(ई) म. द. का. अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.
त्याच अनुषगाने आज दि.23 मे रोजी दुर्गापूर हद्दीतील खेरगाव इथून वाहतूक करणाऱ्या गाडी तून विदेशी दारू मॅकडोवेल न.1 चे निपा किंमत 3,600 रु. ,देशी दारू 4,100 रु. व एक हिरो होंडा गाडी किंमत 40,000 हजार रु.असा एकूण 47,000 चा मुदेमाल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक किशोर सहारे, पो हवा अशोक मंजुळकर व योगेश ह्यांनी केली. अधिक तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.
Add Comment