चंद्रपूर तालुक्यातील अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या गाडी मधून विदेशी दारुसह एकूण 5 लक्ष 48 हजार 200 रु. चामुद्देमाल जप्त करण्यात दुर्गापूर पोलिसांना यश आले आहे.
आज दि.19 लाअवैध दारूविक्रेत्यांवर पाळत ठेवणाऱ्या एका पोलीस पथकाला महिती मिळताच. पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे ह्याच्या मार्गद्शनाखाली दारू बंद रेड करण्यात आली.ह्यात पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीची मारुती स्विफट डिजायर ,व 82 नग हायवर्ड वियर किंमत 41000 व 24 नग मकडोवेल न.1 चे निपा किंमत 7200 हजार असा एकुण 5,48,200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामधे तीन आरोपींनी अटक करण्यात आली.आरोपी 1) नितेश वाशिठ चदनणखेडे 2) सूरज चंपत आगरे दोन्ही रा. भद्रावती व 3) संजय किसन भालेराव रा.दुर्गापूर ह्यांना अटक करून त्यांच्या वर अप. क्र.120/21 कलम 65(आ),(ई),83 मदका अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही दुर्गापूर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने,पो.हवा.सुनिल गोरकर नापोशी उमेश वाघमारे, मनोहर जाधव,सूरज लाटकर, व संतोष आडे ह्यांनी यशस्वी रित्या पार पाडली.पुढील तपास दुर्गापूर चे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात डी.बी.पथक करीत आहे.
दुर्गापूर पोलिसांची अवैध दारू तस्करी वर धडक कारवाई…


Add Comment