महाराष्ट्र सामाजीक

कोरोना महामारीच्या काळात प्रहारसेवक अमोल नन्नावरे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना देतात मोफत ज्ञानाचे धडे……

शेगाव बू _ मनोज गाठले.

स्थानिक शेगाव बू येथून जवळच असलेल्या दादापुर येथील युवा शिक्षण प्रेमी अमोल नन्नवरे कोरोना च्या काळात ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण पासून वंचित राहू नये करिता शिक्षण प्रेमी अमोल ने अनोखा उपक्रम राबवून ज्ञानार्जन धडे मोफत देत असून अनेक विद्यार्थी द्यानर्जरन घेत असल्याचे पाहायला मिळाले..

सध्या संपूर्ण जगासोबत भारतात सुध्दा कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात सर्व शाळा व महाविद्यालये आहेत. त्याअनुषगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. ना. बचूभाऊ कडू (शालेयशिक्षण मंत्री) यांचा आदर्श समोर ठेवून तसेच प्रहारसेवक इंजी.अक्षय बोंदगुलवार व प्रहारसेवक शेरखान पठाण यांच्या पुढाकाराने दादापुर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते अमोल मोरेश्वर नन्नावरे हा गावातील गरीब, हुशार तथा होतकरू विद्यार्थ्यांना निःशुल्क ज्ञानाचे धडे देत आहे. ग्रामीण भागातील मुल इकडे तिकडे विनाकारण फिरू नये व त त्यांच्या भविष्यातील शिक्षणाचं नुकसान होऊ नये व ते योग्य शिक्षणाच्या प्रवाहात राहावे यासाठीच हा उपक्रम अमोलनी हाती घेतला आहे. अमोल सध्या ग्रॅज्युएशन पूर्ण करून M. A. पॉलिटिकल सायन्स सुरू आहे तसेच एमपीएससी तथा युपीएससीची तयारी सुद्धा सुरू आहे. या उपक्रमामुळे सध्या १०-१२ विद्यार्थी रोज येत असून तो वाढवण्याचा अमोलचा माणसं आहे त्यामुळे परिसरात अमोलचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!