राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे 1960 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि 27 एप्रिल 2020 ला 60 वर्षे पूर्ण झाली. हे महाविद्यालय राष्ट्रीय संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास यावरील 47 आठवड्यांचा अद्वितिय आखणी असलेला अभ्यासक्रम 100 जणांसाठी चालवते. या 100 जणांपैकी 25 जण हे मैत्रीपूर्ण संबध असलेल्या देशांमधील असतात. आजमितीस या महाविद्यालयाचे 3899 माजी विद्यार्थी आहेत त्यापैकी 835 जण 69 मैत्रीपूर्ण संबध असलेल्या देशातील आहेत. या माजी विद्यार्थ्यांपैकी अनेकजण त्यांच्या आस्थापनातील वरिष्ठ पदे भूषवत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूषण असण्याबरोबरच हे महाविद्यालय इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबध मजबूत करण्याच्या धोरणातील एक महत्वाची भूमिकाही निभावते. राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीकोनातून धोरणात्मक शिक्षण देणारी एकमेव शिखरसंस्था असूनही शिक्षण व संशोधन या क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्वाचा येथे अभाव आहे. जगभरातील विद्यापिठामध्ये बौद्धिक व शैक्षणिक उत्कृष्टता मिळवण्यासाठी मानाची पदे वा प्रोफेसरपदे दिली जातात.
राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने भारताच्या राष्ट्रपतीनी संरक्षण सचिव अजय कुमार आणि कमांडंट एअर मार्शल डी चौधरी यांच्या उपस्थितीत 11 नोव्हेंबर 2020 ला राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय संरक्षण चेअर ऑफ एक्सलन्स मंजूर केले. प्रेसिडेन्ट्स चेअर ऑफ एक्सलन्समुळे केवळ या महाविद्यालयाची बौद्धिक संपदा वाढेल एवढेच नाही तर महाविद्यालयाची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा कित्येक पटीने उंचावेल.
हे पद राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, 06 तीस जानेवारी मार्ग, नवी दिल्ली येथे असेल आणि त्यास सर्व शैक्षणिक, व्यवस्थापन आणि लॉजिस्टीक सहाय्य पुरवले जाईल.
Add Comment