चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले
देश विदेशात प्रसिद्ध असलेले रामदेगी – संघारामगिरी येथे मागील अनेक दिवसांपासून बौद्ध धर्मगुरू (भंतेजी) व रामदेगी तीर्थक्षेत्र येथील साधुसंत यांना त्यांच्या मठात (मंदिरात) व विहारात रामदेगी संघारामगिरीत वनविभाग जाऊ देण्यास मज्जाव करीत आहे.
रामदेगी हे हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. तर संघारामगिरी हे बौद्धांचे प्रेरणा स्थान आहे. इथे देश विदेशातून बौद्ध अनुयायी व भाविक भक्त येऊन तथागता समोर नतमस्तक होत असतात. तर रामदेगीत भजन कीर्तनाच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतात. यात श्रावण मध्ये डिसेंबर महिन्यातील पाच सोमवारला हजारो भाविक भक्त श्रद्धेपोटी येत असतात. दर्शन घेऊन आपले जीवन धन्य मानत असतात. रामदेगी संघारामगिरी येथील कार्यक्रम आजपर्यँत सुरळीत सुरु होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आला अन रामदेगी-संघरागिरी येथील देवस्थान व विहाराचे गेट वाघ, बिबट यांचा वावर असल्याचे कारण सांगून देवस्थान मधील साधुसंत, बौद्ध धर्मगुरू यांचे जानेयेणे वनविभागाने गेट लावून बंद केले.
वनविभागाचे लावलेले गेट कायमस्वरूपी सुरु व्हावे. साधुसंत, बौद्ध धर्मगुरू, बौद्ध अनुयायी व भाविक भक्त यांना वनविभागांनी कसल्याही प्रकारे अडवणूक करू नये. वनविभागाने लावलेले गेट खुले करावेत. याकरिता 12 फेब्रुवारी ला रामदेगी-संघारामगिरी येथील वनविभाग विरुद्ध वनविभागाच्या गेट वर क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्च्यात हजारो बौद्ध अनुयायी, गुरुदेव सेवा मंडळ, व हिंदू धर्मातील भाविक भक्त सहभागी झाले होते. या मोर्च्यांचे रूपांतर एका सभेत झाले. यादरम्यान डिएफओ गुरुप्रसाद यांना मोर्चेकरांच्या समोर बोलवा व जाब विचारा असे बोलत होते. मात्र यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणीच हजर नव्हते. सायंकाळी सभेनंतर गेट खोलण्याबाबद्द हजारो मोर्चेकरी आग्रही होते. पण यावेळी चिमूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी मध्यस्थी करून आठ दिवसाची वेळ मागितली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या सोबत या विषयावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले. यामुळं मोर्च्या शांततेत होऊन परतला होता. यावेळी बौद्ध धर्मगुरू संघारामगिरीला जाण्या पर्यँत गेट खुले करण्यात आले होते.
यानंतर 15 फेब्रुवारीला रामदेगी येथील व्यावसायिक सलीम पठाण हे बौद्ध धर्मगुरू यांना सोडून देण्यासाठी गुजगव्हांन ते रामदेगी-संघारामगिरी येथे जात असतांना वनविभागांनी अजून गेट जवळ अडवुन करून संघारामगिरी येथे जाण्यास नकार दिला. यावर वनविभाग (बफर) चे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे सोबत सलीम पठाण यांनी भ्रमणध्वनी वर संपर्क केला असता. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले की, आज पर्यँत फोन केला तरी आम्ही संघारामगिरी – रामदेगी येथे जाऊ देत होतो. मात्र आता 12 तारखेचा मोर्चा झाला तेव्हापासून कोणालाही संघारामगिरी – रामदेगी येथे जाऊ देऊ नये. असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळं बौद्ध धर्मगुरू असो, या रामदेगी देवस्थानचे अध्यक्ष असो कोणालाही जाऊ देता येणार नसल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले. असून डिव्हिजन कार्यालयाने संघारामगिरी व रामदेगी येथे कोण कोण जाणार आहेत. किती व कोणत्या गाड्या जातील याबाबद्द सविस्तर याद्या देण्यात याव्यात. तशी चंद्रपूर येथील डिव्हिजन कार्यालयाकडून परवानगी आणावी. त्यानंतरच जितक्या व्यक्तींची परवानगी देण्यात येईल. तेवढ्याच व्यक्तींना या गेट वरून रामदेगी-संघारामगिरी येथे जाण्यास सोडण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी भ्रमणध्वनी वरून सलीम पठाण यांचे सोबत बोलतांना सांगितले.
Add Comment