कृषी महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराची खरेदी एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ द्या .. आमदार बंटीभाऊ भांगडीया

चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले

चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराने शेतकऱ्यांकडील शेतमाल खरेदीसाठी सक्षम (आदिवासी व सर्वसाधारण) संस्थांच्या माध्यमातून धानाची खरेदी सुरू असून दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंतच खरेदी होती परंतु विविध कारणे व अडचणी यामुळे परिपूर्ण खरेदी होऊ शकली नसल्याने शेतकरी वर्ग आधारभूत दरापासून वंचित राहत असल्याने सरसकट एप्रिल 21 पर्यत मुदतवाढ देऊन आधारभूत खरेदी सुरू करण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली असून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

.

चंद्रपूर जिल्ह्यात दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड द्वारा शासकीय आधारभूत दर आणि सहकारी संस्था चंद्रपूर यांचे माध्यमातून विविध केंद्रावरुन सुरू असलेल्या धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी करून तांत्रिक तर प्रामुख्याने ग्रामीण भागाचे (धान उत्पादक तालुके विशेषत: चिमूर,सिंदेवाही,नागभीड) खरेदी केंद्रांत कधी बारदाने व वाहतूक व्यवस्थेत विलंबाचे कारणाने संपूर्ण खरेदी पूर्ण झाली नाही सदर केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं धान पूर्णतः मोजमाप होऊन गोडावून मध्ये जमा झाले नसतांना गोदामातील क्षमता आधीच पूर्ण झाल्याचे आणि साठवणूक शक्य नसल्याचे कारण दाखवून खरेदी थांबविण्यात आलेली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांचे रीतसर कागदपत्रे ७/१२ असतांना अलीकडच्या ढगाळ,मौसमी वातावरण व खराब हवामानामुळे बरेच शेतकरी मनी पासून वंचित राहिले त्यात नोंदणी केलेल्यांनी त्यांचे धान्य मोजणी केंद्रावर पोहोचवू शकले नसल्याचे शेतकऱ्यांची दि.३१ मार्च २०२१ च्या खरेदीस मुदतवाढ देऊन माहे एप्रिल २०२१ पर्यंत करण्याची सरसकट मागणी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात बरेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान अद्यापही मोजमाप काटे न झाल्याने शेतकरी पुढील शासकीय आर्थिक लाभ-हक्कापासून वंचित होण्याची भीतीमुळे प्रशासन व शासनाविरुद्ध असंतोषाची व उद्रेकाची स्तिथी निर्माण होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदीस सरसकट माहे – एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषिमंत्री दादा भुसे,पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन दिले असून निवेदनातून मागणी करीत अन्यथा शेतकऱ्यासोबत आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!