चंद्रपूर -चंद्रपूरकरांना सर्वप्रथम साऊथ इंडियन पदार्थांची अस्सल लज्जत चाखायला देणाऱ्या शहरातील सर्वात जुन्या हॉटेल पैकी एक असलेल्या मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध कॅफे मद्रास हॉटेलला आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. बघताबघता ही आग उग्र रूप धारण करणार अशी शक्यता असतानाच परिसरातील अन्य दुकानदार, नागरिक ह्यांनी समयसूचकता दाखवुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन दलास पाचारण केल्याने अनर्थ टळला.
प्राप्त माहिीनुसार नुसार कॅफे मद्रासच्या स्वयंपाकगृहात आचाऱ्याने तडका मारताच अचानक आगीचा भडका उडाला मात्र ही आग स्वयंपाक गृहात न लागता मागच्या भागात पेट घेतला. त्याच ठिकाणी हॉटेल साठी लागणारे सिलेंडर ठेवले असल्याने एकच तारांबळ उडाली मात्र हॉटेल व्यवस्थापन, परिसरातील दुकानदार व नागरिकांनी समयसूचकता दाखवुन तिथे असलेल्या गॅस सिलेंडरचे रेगुलेटर बंद करून सिलेंडर बाजुला केल्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.
ह्या अपघातात कुणालाही इजा झाली नसुन घटनेवेळी हॉटेल मधे ग्राहक उपस्थित होते. हॉटेल मधे असलेल्या डक्टींग मुळे ही आग हॉटेलच्या दर्शनी भागात पसरल्याने दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हॉटेल कॅफे मद्रास येथे काही वर्षांपूर्वीही आग लागली होती हे विशेष.
Add Comment