वरोरा – तालुक्यातील भटाळा येथील शेतकरी नामदेव कटू गराडे हे आपल्या शेतात आज दिनांक 10 नवेंबर ला दुपारी कापूस वेचत असताना दडी मारून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या आवाजाने त्या शेतात असणाऱ्या शेतकरी व महिलांच्या आरडा ओरडा बघून वाघाने तिथून पळ काढला. यामधे माणिक मारोती जांभुळे, प्रभाकर नामदेव मगरे आणि मैनाबाई माणिक जांभुळे यांनी वेळेवर वाघाला हुसकून लावल्याने मोठा अनर्थ टळला मात्र उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे गंभीर अवस्थेत असणाऱ्या नामदेव गराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने भटाळा येथील गावकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
भटाळा व आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी अगोदरच वाघाच्या दहशती मधे आहे व मागील तीन दिवसापूर्वी याच परिसरात वाघ विहिरीत पडला होता अशातच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या परिसरातील वाघावर प्रतिबंध लावला नसल्याने आता चक्क वाघाचा हल्ला शेतकऱयांवर झाल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे . वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करा अशी मागणी ग्रामवासी करीत आहे.
Add Comment