Breaking News

शेतकऱयांनी आता निर्यातदार व्हावे – नरेंद्र जिवतोडे

भद्रावती – दि 1।2।2022 किसानपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री नरेंद्रभाऊ जिवतोड यांच्या वतीने शेतकऱ्याचा शेतमाल विदेशात निर्यात संदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले प्रशिक्षणाला मुख्य मार्गदर्शक सचिन झीरपे,दुबई येथील निर्यातदार होते, त्यांनी शेतकऱ्याचा शेतमाल शेतकर्याच्या बांधावरूनच नगदी स्वरूपात खरेदीचे आश्वासन दिले. प्रशिक्षण किसानपुत्र समूहाच्या शेतावरती आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ अर्चनाताई ,नरेंद्र जिवतोड, पं स सभापती प्रवीणभाऊ ठेंगणे, तालुका कृषी अधिकारी जाधव मॅडम, मंडळ कृषी अधिकारी झाडे साहेब, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ एकरे, आकाशभाऊ वानखेडे, निखिलभाऊ वानखेडे, विस्मयभाऊ बहादे चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्य प्रगतिशील शेतकऱयांची उपस्थिती होती.

error: Sorry !! Content is Copyright protected !!