पोलीस स्टेशन वरोरा हृददीतील मौजा निलजई येथे स्वत:च्या मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या वडीलास ११/११/२०२१ रोजी मा. डी. के. भेंन्डे, जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोर्ट १ ले वरोरा यांनी जन्मठेपेची शिक्षा • ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन वरोरा हददीतील मौजा निलजई येथील आरोपीने स्वतःचे मतीमंद मुलीवर शारिरीक संबंध करून तिला गर्भवती केली. व कुणालाही याबाबत सांगितले तर जीवानिशी मारुन टाकण्याची धमकी देवून मतीमंद मुलीला व फिर्यादीस मारहाण केली. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वरोरा येथे अप.क. ५३२/२०१८ कलम ३७६ (२), (सी) (आय) (एफ), (एन), ३२३,५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा तपासात घेतल्यानंतर सपोनि. अमित ए. मांडवे यांनी
आरोपी निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात
दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक ११/११/२०२१ रोजी आरोपी नामे सुभाष बापुरावजी भडके, वय ५० वर्षे, रा. निलजई, ता. वरोरा यास कलम ३७६ (२), (सी) (आय) (एफ), (एन),भादंवि मध्ये “जन्मठेप’ची शिक्षा व २,०००/- रू दंड, दंड न भरल्यास ०३ महीने कारावास व कलम ५०६ भादवी मध्ये ३ महीने कारावासाची शिक्षा व १००० / – रु दंड मा. डी.के. भेंन्डे, जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोर्ट १ले वरोरा यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. एम. एम. देशपांडे, सरकारी अभियोक्ता, वरोरा आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा. चरणदास पिदुरकर, पोलीस स्टेशन वरोरा यांनी काम पाहिले.
Add Comment