पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

अखेर दुर्गापूर परिसरातील चोरीच्या प्रकार उघडकीस

चंद्रपूर – येथील दुर्गापुर परिसरात काही महिन्या आधी दि. 22/07/2021 च्या पुर्वी रात्री 10 च्या सुमारास चोरीची घटना घडली.
सदर घटनेची नोंद दुर्गापुर पोलिस स्टेशनात नोंदविण्यात आली.
पोलिसांनी कारवाई केली असता चोरांनी तब्बल 28 हजार रुपयांची दागिने लंपास केलेले उघडकीस आले. सदर घटनेतील चोराचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली असता अखेर आरोपी असलेला उल्हास विनायक झिलटे. वय 36 वर्ष असून तो पोलिसांचा हाती लागला. आरोपी हा दुर्गापुर परिसरात राहत असून त्याच्याकडून चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला.
चोरीचा हा प्रकार पोलीस निरीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने ,पोहवा सुनील गोरकार, पोशि मंगेश शेंडे, मनोहर जाधव, किशोर, वाळके यांनी उघळकीस आणला असून वरील प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!