चंद्रपूर जिल्हा घडामोडी सामाजीक

सर्पदंशाने बैल मृत झाल्याने शेतक-याला आर्थीक मदत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम

भद्रावती (प्रतिनिधी) :

    बैल हा शेतक-याचा शेतीकामातील जोडीदार आहे. बैल नसेल तर सामान्य शेतक-याला शेती कसणे कठीण होवून जाते. अशातच जर शेतक-याचा बैल काही कारणाने मृत झाला तर शेतीकामे प्रभावित होतात. शेतकरी हतबल होतो. मात्र शेतक-याच्या सदैव पाठीशी राहणारी जिल्हा बँक शेतक-याच्या अस्मानी व सुल्तानी संकटात नेहमी धावून आली आहे. जिल्हा बँकेच्या ‘शेतकरी कल्याण नीधी’ योजनेअंतर्गत आजमितीला जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांना शेतीपुरक साहित्य व जनावरांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.     तालुक्यातील टाकळी या गावचे शेतकरी प्रविण सुधाकर बलकी यांचा बैल नुकताच सर्पदंशाने मरण पावला. त्यांना शेतीकामात फार अडचण येवू लागली. याची दखल घेत, आज (दि.२२) ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भद्रावती यांचे सौजन्याने बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांचे सहकार्याने व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष व विदयमान संचालक रवींद्र शिंदे यांचे हस्ते तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी प्रविण सुधाकर बलकी यांना बँकेचे ‘शेतकरी कल्याण नीधी’ योजनेअंतर्गत दहा हजार रुपये रोख रकमेची मदत करण्यात आली.    यावेळी शाखा व्यवस्थापक ए. एस. घुगुल, निरीक्षक आर. आर. बारहाते, कर्ज लिपिक एस. बी. चटकी आदी उपस्थित होते.
यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे यांनी बँकेच्या विविध कल्याणकारी योजना असुन कास्तकारांनी व शेतमजुरांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले.     सोबतच ट्रस्ट तर्फे सुरु असलेल्या कामांची व योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पालकांच्या, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व गरीब-गरजु कूटुंबातील पाल्यांच्या विवाहाचा खर्च ट्रस्ट करणार असुन त्याबाबतची नोंदणी अभियान सुरु झाले आहे. इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च ट्रस्ट उचलत आहे. तेव्हा गरजुंनी ट्रस्टच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवि शिंदे यांनी यावेळी केले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!