लाखों चा भ्रष्टाचार ,आर्थिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करण्याची सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ची मागणी व ठराव पारित ,
पोलीस स्टेशन मार्फत गुन्हे शाखेला दिली तक्रार
प्रतिनिधी नेरी।
येथून जवळ असलेल्या मासळ ग्रा प मध्ये लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून नव्यानेच निवडुन आलेल्या सर्व सदस्य ची पहिली सभा 26मार्चला आर्थिक व्यवहार तपासणे व जमा खर्च मंजूर करणे या विषयावर झाली परन्तु ग्रामसेवक पी एम लामगे यांनी जमाखर्च दाखविले नाही व विचारलेल्या प्रश्ननाची उडवाउडवीची उत्तरे त्यामुळे मासिक सभेत जमाखर्च नामंजूर करून आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर द्वारे चौकशी करण्याकरिता ठराव मंजूर करण्यात आला परन्तु ठरावाची प्रत न देता ग्रामसेवक सभेमधून पळून गेले तेव्हा दि 28 मार्चला पोलीस स्टेशन चिमूर मार्फत पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर याना सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी तक्रार दाखल केली आहे
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत मासळ येथे नवनियुक्त सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांची 26 मार्चला पहिली मासिक सभा आर्थिक व्यवहार तपासणे व जमा खर्च तपासणे या विषयावर झाली यात ग्रामसेवकाला हिशोब मागितला असता त्यांनी उडवाउडवी ची उत्तरे देत सभेतून पळ काढला यात गृह कर पाणीकर सामान्य पावती कर आणि 14 वा वित्त आयोग याचा किती निधी प्राप्त झाला व खर्च किती याचा हिशोब पाहिला असता यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले सण 19-20 या आर्थिक वर्षात गृहकर पाचलाख चाळीस हजार आठशे अठावन पाणी कर एक लाख एकोणसाठ हजार आठशे अठरा दुकान गाळे किराया एक लाख पंचवीस हजार आणि 14 वित्त आयोग चार लाख चाळीस हजार दोनशे छप्पन रुपये एवढा आहे परंतु सदर खर्चाचे तपशील ग्रा प कमिटी ला दिले नाही सदर रकम जमा न करता परस्पर खर्च केली आहे असें निदर्शनास आली त्यामुळे लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले
तसेच ग्रा प कर्मचारी पाणीपुरवठा शिफाई यांचे दोन वर्षाचे वेतन इलेक्ट्रिकसाहित्य खरेदी ,साउंड सर्व्हिस,हाटेल ,इलेक्ट्रिक दुरस्थि, किराणा ची उधारीअसे एकूण एक लाख एकोन चाळीस हजार पाचशे देने बाकी आहे तसेच सामान्य फंड मध्ये फक्त 3500 पाणी पुरवठा खात्यात 1800 रुपये शिल्लक बाकी आहेत या वरील रकमेचा अवलोकन केले असता आर्थीक गैरव्यवहारात भ्रष्टाचार झाला तसेच चालू वर्षात इलेक्ट्रिक साहित्य खरेदीत22500 रुपये उधारी दाखविली आहे परंतु त्याचे बिल रेकॉर्ड ला उपलब्ध नाही आणि या सर्व खरेदी बाबीचे बिल रेकार्ड ला उपलब्ध नाही त्यामुळे ग्रामसेवक लांमगे यांनी आर्थिक गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केला हे उघड होते त्यामुळे सण 2015-21 पर्यंतचे आर्थिक व्यवहाराची चौकशी करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर व उचित कार्यवाही करावी अशी ग्रा प मासळ च्या संपुर्ण कमेटीनी केली आहें सदर प्रकरण माहिती साठी मुख्यकार्यकारी अधिकारी जी प संवर्ग अधिकारी प स याना सादर केला आहे
Add Comment