आरोग्य महाराष्ट्र

नगरच्या सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये अग्नीतांडव! दहा जणांचा दुर्दैवी अंत! जिल्हाधिकारी डाॅ. भोसलेंची घटनास्थळी धाव!

नगर शहर : जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचा आज सकाळी आग लागली. या विभागात एकूण १७ रुग्ण होते. यात सुमारे १० रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्याची अधिकृत माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितली नाही.

अतिदक्षता विभागाला आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. एमआयडीसी आणि महापालिकेच्या अग्निशामक दलांनी ही आग विझवली. आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घटनेची माहिती दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रुग्णालय बहुतेक पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्र भोसले, कॅम्प पोलीस स्टेशनचे शिशिरकुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल आहेत.

शाॅर्टसर्किटमुळे या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृृृृतांमध्ये रामकिसन हरगुडे, सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, कडूबाई गंगाधर खाटीक, शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्‍वनाथ जडगुळे तसेच एक अनोळखी पुरुष अशी आदींचा समावेश आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!