दीपावली सारख्या सणांमध्ये देशाचे सैनिक बंधू आणि भगिनी आपल्या परिवारा पासून दूर देशाच्या सीमा सुरक्षेसाठी आपल्या कर्तव्य भावनेची प्रचिती देतात सर्व देशवासीयांच्या सुरक्षीततेची जबाबदारी समर्थपणे पार पाडीत आहे. त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या सन्मानार्थ एक दिवा प्रज्वलित करण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. या आवाहनाला सर्व देशवासीयांनी साथ देत सैनिकांचा सन्मान व गौरव करावा अशी विनंती पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे. देशाच्या सैनिकांसाठी अहीर यांनी त्यांच्या निवासस्थानी परिवारासोबत दिवा प्रज्वलित केला यावेळी ते बोलत होते.
देशाचे सैनिक सीमेवर आपल्या सुरक्षीततेसाठी लढत आहेत. आपल्या वीर पराक्रमाने देशात शांती ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करून यश संपादन करीत आहेत त्यांचा देशवासियांतर्फे गौरव होणे गरजेचे असतांना दीपावली सारखा पावन पर्व आपण दिव्यांच्या प्रकाशाने लखाखतो त्यातच एक दिवा वीर सैनिक बंधू भगिनी व त्यांच्या परिवाराच्या सन्मानासाठी प्रज्वलित करावा असे आवाहन यावेळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
Add Comment