मजुरीचे पैसे तात्काळ द्या .प्रहार ची मागणी .
शेगांव बू — प्रतिनिधी , मनोज गाठले .
स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या भेंडळा येथे येथे सदर वरोरा नॅशनल हायवे रोड चे काम करणारी एस आर के कंपनी चे मुख्य कार्यालय असून या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून रोज मजुरी करणारे गरीब मजुर चे मजुरी वेतन न मिळाल्याने यांच्यावर उपासमारीची पाळी येते असून या गंभीर समस्या वर एस आर के कंपनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून यांची अवहेलना करिता तेव्हा या गंभीर समस्या लक्ष्यात घेऊन येथील कामगार मजूर आक्रमक होऊन आपल्या हक्काच्या मागणी करिता रस्त्यावर उतरले असून कंपनीच्या मुख्य मार्गावर ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले ..
तर या कंपनीतून दररोज ये जा करणारे अनेक वाहने आल्या ठिकाणी उभे असल्याने कंपनीला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे समजत आहे .
तरी देखील सुधा ही कंपनी या मजुरावर अन्याय करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तेव्हा या गरीब मजूर कामगाराचा पगार , मजुरी त्यांना तात्काळ देण्यात यावी या करिता प्रहार जन शक्ती पक्ष शेगाव बू चे युवा कार्यकर्ते श्री अक्षय बोंद गुलवार यांच्या सह शेरखान पठाण , सलीम पठाण , राकेश भूतकर , हे कार्यकर्ते सोमवार पासून यांच्या मागणी साठी आखी रात्र न दिवस एक करून जागी रहाली हे मात्र अधिक मोलाचे सहकार्य आहे .
विशेष म्हणजे या पूर्वी देखील या मजुरांनी अश्या प्रकारे आंदोलन करून आपली मजुरी मागितली तेव्हा या कंपनीचे मुख्य अधिकारी श्री प्रसाद यांनी येत्या दहा दिवसांत तुमचे पूर्ण वेतन , पगार देण्यात येईल अशी ग्वाही देऊन त्यांना काही रुपये देऊन सांत्वन केले परंतु आज त्यांनी दिलेला शब्द खाली पडला असून या मजूर वर्गावर उपासमारीची पाळी आल्याने येथील प्रहार सेवक सह येथील कामगार आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे .
बाईट.
“””” विशेष म्हणजे या गरीब मजूर वर्गा चे गेल्या महिन्या पासून ३५ लाख रुपये असून फक्त कंपनी लाख रुपये देऊन सांत्वन करीत आहे. हा माझ्या व माझ्या जमुरावर अन्याय आहे तो मी सहन करणार नाही जो पर्यंत माझ्या मजुराला पगार वेतन मजुरी मिळणार नाही तो पर्यंत मी मुख्य मार्गावर ठिय्या आंदोलन करणार व कोणतेही वाहन जाऊ – केव्हा येऊ देणार नाही ..
नाली बांधकाम
मजुरा चे मुख्य अधिकारी श्री अमित सिंघा .. यांनी आपले मनोगत पुण्य नगरी प्रतिनिधी शी व्यक्त केले . “”
Add Comment