माठाच्या किमतीतई झाली मोठी वाढ
चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले
उन्हाळ्यात चाहूल लागताच थंड पाणी पिण्यासाठी गरीबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढते.यंदाच्या वर्षी तरी काहीसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सुरवातीला दिसत होते.मात्र कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये माठ खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे.यावर्षी मार्च महिना संपला तरी पाहिजे त्या प्रमाणात माठ विकले न गेल्याने कुंभार समाज मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
मागील वर्षी उन्हाळ्याच्या हंगाम सुरू होताच कोरोनामुळे लाकडाऊन करण्यात आले होते.आणि कुंभार व्यवसाय अडचणीत सापडला.यावर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला माठ विक्री सुरू झाली फ्रीज चे पाणी पिण्याचे ऐवजी ग्रामीण भागात माठातील पाण्याला अधिक पसंती देतात.मात्र चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत असल्ल्याने नागरिक घराबाहेर पडत नसल्याने कुंभार व्यवसाय पुन्हा अडचणीत येतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.माठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या दरामध्ये यावर्षी वाढ झाली त्या मुळे या वर्षी माठाच्या किमतीत वाढ झालेली असल्याने माठाच्या किमतीत २० ते ३० रुपयाची वाढ करण्यात आल्याचे कुंभार व्यवसायकांनी आज पळसगांव येथील आठवडी बाजार मध्ये सांगितले.कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.व्यवसाय होईल की नाही याची चिंता कुंभार समाजाला आहे मात्र गतवर्षीही कोरोणामुळे माठ विक्रीवर मोठा परिणाम होत आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.रत्नापुर येथील कुंभार व्यावसायिक लक्ष्मण पात्रे यांच्या धर्मपत्नी ने प्रस्तुत युवराष्ट्रदर्शन प्रतिनीधीनिशी बोलताना आज सांगितले.
Add Comment