Breaking News कोरोना ब्रेकिंग चंद्रपूर जिल्हा घडामोडी

चंद्रपूरकरांसाठी सुखद बातमी आज बधितांच्या संख्येत मोठी घट…

Good news for Chandrapurkarana, a big drop in the number of victims today ...
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 1067 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 687 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 19 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.



जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 75 हजार 885 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 63 हजार 818 झाली आहे. सध्या 10 हजार 856 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 29 हजार 160 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 48 हजार 641 नमुने निगेटीव्ह आले आहेत.



आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील दत्तनगर येथील 55 वर्षीय पुरुष, अष्टभुजा वार्ड येथील 50 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 46 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 53 व 72 वर्षीय पुरुष, अंचलेश्वर वार्ड येथील 70 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, शांती नगर येथील 60 वर्षीय पुरुष.
भद्रावती तालुक्यातील 72 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील जामगाव येथील 61 वर्षीय महिला. चिमूर तालुक्यातील आंबेनेरी येथील 66 वर्षीय पुरुष.
गोंडपिपरी तालुक्यातील 75 वर्षीय महिला. गडचांदूर येथील 53 वर्षीय पुरुष. व्याहाड सावली येथील 60 वर्षीय पुरुष. सोनेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 41 वर्षीय पुरुष. कोरपणा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.



जिल्ह्यात आतापर्यंत 1211 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1120 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 38, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्याची रुग्णसंख्या
ठिकाण रुग्ण संख्या
चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 188
चंद्रपूर तालुका 23
बल्लारपूर 87
भद्रावती 73
ब्रम्हपुरी 26
नागभिड 20
सिंदेवाही 13
मूल 59
सावली 27
पोंभुर्णा 06
गोंडपिपरी 31
राजूरा 23
चिमूर 09
वरोरा 30
कोरपना 55
जिवती 00
इतर ठिकाणच्या 17
एकूण 687




नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


























About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!