सुरज नरुले
(चिमूर तालुका प्रतिनिधी)
चिमूर शहरामध्ये हिलींगटच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिमूर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून खुलेआम दारातच २ लाख रुपये घेवुन व चुकीच्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करून रुग्ण मारले जात होते. सदर हॉस्पिटल मध्ये कोविड रुग्णांवर उपचार होऊ शकतो असा खोटा प्रस्ताव आरोग्य आधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यावरून त्यांच्या वर विश्वास ठेवुन जिल्हाधिकारी यांनी कोविड च्या अटी व शर्ती वर उपरोक्त हॉस्पिटल ला कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती.
त्यामुळे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर या हॉस्पिटल मध्ये भरती करून त्यांच्या कडून दोन अडीच लाख रूपये रुग्णाला भरती करते वेळीच घेण्यात येत होते. शैक्षणिक पात्रता नसलेल्या डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने रुग्ण दगावत होते. कोविड केंद्राची मान्यता मिळायच्या अगोदरच कोविड रुग्ण भरती केल्या जात होते. तसेच त्यांना रेमडिसिवर चे इंजेक्शन देण्यात येत होते. रुग्णांच्या नातेवाईकांना धाक देवुन रुग्ण दगावला असतांनाही खरी माहिती न देता त्यांच्या कडून जेव्हढि रक्कम काढता येईल तेव्हढी रक्कम हॉस्पिटल चे संचालक साईनाथ बुटके वसूल करीत होते. यांना वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही ज्ञान अथवा माहिती नसतांनाही एखाद्या अनेक वर्षाचा अनुभव असलेल्या डॉक्टरां सारखा आविर्भावात वागणूक करीत होता.
वैद्यकीय देय्यकाची रक्कम वाढविण्यासाठी एकाच दिवशी एका रुग्णाला 20 ऑक्सिजन सिलेंडर लावल्याचे देय्यकात दर्शविले आहेत, रुग्ण भरती होण्या अगोदरच्या दिवसाचे देयके दिल्या जात होते. इमर्जन्सी चार्जेस म्हणून चाळीस-पन्नास हजारांची वसुली रुग्णांच्या नातेवाइकां कडून केली जात होती. एव्हढेच नाही तर सदर हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांना होमोपेथी औषधं देत होते पण नेमके कोणते औषधं द्यायचे त्याचा उल्लेख वैद्यकीय देय्यकात नाही. रुग्णांना गोळ्या औषधं देतांना त्यावर मंत्र उच्चार करून देण्याकरिता एक मांत्रिक सुध्दा ठेवण्यात आलेला आहे. अशी अघोरी उपचार पद्धती या हॉस्पिटल मध्ये सुरू होती. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण प्रॉपर उपचारा अभावी एकामागोमाग दगावत होते मात्र अवैधरित्या व गैरमार्गाचा अवलंब करून करोडो रुपये कमावण्याच्या लालचेत एका वर एक रुग्ण मृत होतांना जराही साईनाथ बुटके च्या दगडाचे ह्दय किंचितही हेलावले नाही.
हॉस्पिटल मध्ये अनेक रुग्ण दगावले असतांना व नगर परिषदे कडून त्यावर अंत्यसंस्कार सुध्दा केले मात्र दोनच रुग्ण दगावल्याची नोंद नगर परिषदेला करण्यात आली. आपल्या हॉस्पिटल मध्ये रुग्णांवर चांगले उपचार होतात याचा देखावा करण्याकरिता साधारण रुग्णांची video क्लिप तयार करून ती व्हाट्सएप द्वारे साईनाथ प्रकाशित करीत होता त्यामुळे रुग्ण मानसिक प्रभावी होऊन या हॉस्पिटल मध्ये जात होते. वरिल सर्व हॉस्पिटल चे गैरप्रकारा बाबत विलास मीहीनकर या पत्रकाराने धैर्याने बातम्या प्रकाशित करून सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला असता धोकेबाजीने विलास मोहीनकर ला हॉस्पिटल मध्ये बोलावुन बेदम मारहाण केली व उलट त्याचीच तक्रार करून पोलिसांकडून राजकीय दबावाखाली खोट्या गुन्ह्यात साईनाथ ने फसवीले.
भारतीय क्रांतिकारी संघटनेला जेंव्हा हा अन्याय होत असल्याचे समजले तेंव्हा संघटनेचे अध्यक्ष डाव्रिन कोब्रा, सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर यांनी जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद ,व पोलिस प्रशासनाला तक्रार वजा निवेदन देऊन हॉस्पिटल तात्काळ बंद करण्यात यावे ,कोविड रुग्णांच्या वैद्यकीय देय्यकाची रक्कम परत करण्यात यावी , व संबंधितांवर पोलिस कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याच प्रमाणे मा. आमदार बंटी भांगडिया यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी आज दिनांक 6/5/2021 ला गांभिर्याने लक्ष देवुन तातडीने हीलिंग टच मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल चिमूर येथील कोविड रुग्णांवरिल उपचारांची परवानगी रद्द केली.
यामुळे अनेक कोविड रुग्णांचा जीव वाचण्यास मोठी मदत झाली असुन तक्रार कर्त्यानी आमदार व जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.
आदेशा प्रमाणे उप विभागीय आधिकारी यांनी तात्काळ हीलिंग टच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ला शील करून कोविड रुग्णांना शासकीय हॉस्पिटल मध्ये भरती करणे गरजेचे होते पण अजूनही तेथील रुग्णांवर अघोरी उपचार सुरूच आहे यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवमानना करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर ने हॉस्पिटल बांधकामाची परवानगी नसल्याने हॉस्पिटल त्वरित शील करावे. वार्ताहर विलास मोहीनकर वरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी सारंग दाभेकर, डार्विन कोब्रा, टेरेन्स कोब्रा, कैलास भोयर, विलास भसारकर , शैलेश भोयर, शांतिभूषण सोरदे , शिवम सोरदे, करीत आहे.

Add Comment