चंद्रपूर जिल्हा घडामोडी

नेरी-शिरपूर नाकाबंदी दरम्यान होंडा एक्टीवा दुचाकीसह 60 हजार 600 रुपयांचा अवैध विदेशी दारू सहीत मोहदारूवर कारवाई

Honda Activa two wheeler with illegal foreign liquor worth Rs 60,600 during Neri-Shirpur blockade

नेरी पोलीस चौकीचे पोलीस उप निरीक्षक राजु गायकवाड यांची धडक कारवाईने नेरी येथील अवैध दारू तस्कराचे धाबे दणाणले

चिमूर:-

दिनांक 01/05/2021 रोजी मा. पोलीस अधिक्षक सो. मा. अपर पोलीस अधिक्षक सो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. तसेच मा. पोलिस निरिक्षक श्री. रविंद्र शिंदे सा. यांचे मार्गदर्शनामध्ये मौजा नेरी – शिरपूर रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान आकाश हरीचंद्र बांगळे, वय २३वर्ष, रा. गांधीवार्ड, नेरी ह्यचेवर दारूबंदी बाबत कार्यवाही केली असता त्याचे ताब्यातील दुचाकी गाडीचे डिक्कीत १९ नग डिएसपी ब्लॅक प्रत्येकी १८०मिली. भरलेली विदेशी दारु. किं. ७,६००रु., एका प्लास्टिक कॅनमध्ये १० लीटर हातभट्टी मोहादारु, किं. ८,०००रु. तसेच गुन्हात वापरलेली होंडा एक्टीवा दुचाकी वाहन क्रमांक MH 31- CX- 9018, किं. ४५,०००रु.,असा एकूण ६०,६००रु. चा माल मिळून आला.



या कारवाईत नेरी पोलीस चौकीचे पोलीस उप निरीक्षक राजु गायकवाड यांची धडक कारवाई ने नेरी परिसरातील अवैध देश विदेशी मोहदारू तस्कराचे धाबे दणाणले असून आरोपी विरुद्ध रितसर दारू बंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून सदरची कार्यवाही पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत पोलीस चौकी नेरी चे उपपोलिस निरीक्षण राजु गायकवाड, NPC/20, दिनेश सूर्यवंशी, PC/2565, सचिन साठे, PC/2765, विशाल वाढई सैनिक 1396, 1470 यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.











About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!