गुप्त माहिती द्वारे रचला सापळा
चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले
खडसंगी जवळील वाहनगाव येथे काल दुपारच्या सुमारास अवैद्य सागवान बाटम पकडल्याने खडसंगी परिसरातील अवैद्य सागवान काम करणारे धास्तावले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक नागरिक वेगवेगळे शक्कल लढवून काहीं ना काही कारनामे करतांना दिसत आहे. मग यामध्ये अवैध दारू, सटापट्टी, गांजा, व सागवान तस्करी असे अनेक प्रकार खडसंगी परिसरात सुरु आहेत.
यातच काल दुपारच्या सुमारास वनविभाग प्रादेशिक यांना अवैद्य सागवान चे काम करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली असल्याने, त्यानुसार वाहनगाव येथील वासुदेव डोमाजी किरमिरे अंदाजानुसार (वय 50 वर्ष) यांच्या घरी वनविभाग प्रादेशिक चे कर्मचारी यांनी आपल्या पथकासहीत धाड टाकली असता, वासुदेव डोमाजी किरमिरे यांच्या अंगणातून सागवानचे बॅाटम 8 नग व गोल लाकूड जप्त करण्यात आले. त्यानुसार अ. क्र. 353/1 दि. 20/3/2021 जारी करून चौकशी सुरु असल्याची माहिती वनविभाग प्रादेशिक यांनी दिली. यावेळी धाड टाकून चौकशी पथकात वनविभाग प्रदेशिकचे खडसंगी क्षेत्र सहाय्यक घुगरे, वनरक्षक ढोके, अवचार व वनकर्मचारी उपस्थित राहून सदर ची कारवाई भारतीय वन अधिनियम 1926 (1) आय व 41/42 नुसार सदर अवैद्य सागवान तस्करवर कारवाई करण्यात आली.
Add Comment