Breaking News कोरोना ब्रेकिंग चंद्रपूर जिल्हा घडामोडी

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 2151 कोरोनामुक्त, तर 22 मृत्यू…

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 2151 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1180 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 71 हजार 728 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 56 हजार 599 झाली आहे. सध्या 14 हजार 27 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 12 हजार 583 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 36 हजार 639 नमुने निगेटीव्ह आले आहेत.



आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 55 वर्षीय पुरुष, महाकाली वार्ड येथील 42 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, नेहरू नगर वार्ड परिसरातील 70 वर्षीय पुरुष, संजय नगर येथील 60 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, जीवन ज्योती कॉलनी रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 81 वर्षीय पुरुष, चिखल परसोडी येथील 62 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील 62 वर्षीय पुरुष, करंजी येथील 60 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील काजळसर येथील 35 वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील 42 व 50 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.



जिल्ह्यात आतापर्यंत 1102 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1017 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 34, यवतमाळ 34, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्याची रुग्णसंख्या
ठिकाण रुग्ण संख्या
चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 374
चंद्रपूर तालुका 58
बल्लारपूर 114
भद्रावती 91
ब्रम्हपुरी 35
नागभिड 27
सिंदेवाही 12
मूल 125
सावली 35
पोंभुर्णा 04
गोंडपिपरी 49
राजूरा 50
चिमूर 25
वरोरा 105
कोरपना 53
जिवती 07
इतर ठिकाणच्या 16
एकूण 1180




नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


















About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!