आरोग्य कोरोना ब्रेकिंग चंद्रपूर जिल्हा घडामोडी

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 392 कोरोनामुक्त 1135 पॉझिटिव्ह ; सात मृत्यू

In Chandrapur district, 392 corona-free 1135 positives in last 24 hours; Seven deaths
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 392 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1135 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून सात बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 39 हजार 54 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 554 झाली आहे. सध्या 8948 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 20 हजार 367 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 74 हजार 986 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये घुग्गुस येथील 66 वर्षीय पुरुष, राजोली मुल येथील 53 वर्षीय पुरुष, विकास नगर वरोरा येथील 86 वर्षीय पुरुष, दडमल वार्ड चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष, नगीना बाग चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला, गजानन महाराज चौक चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष, न्यू पटोले नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 552 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 505, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.



चंद्रपूर जिल्ह्याची रुग्णसंख्या
ठिकाण रुग्ण संख्या
चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 463
चंद्रपूर तालुका 58
बल्लारपूर 81
भद्रावती 107
ब्रम्हपुरी 118
नागभिड 37
सिंदेवाही 07
मूल 26
सावली 04
पोंभुर्णा 03
गोंडपिपरी 06
राजूरा 25
चिमूर 04
वरोरा 155
कोरपना 15
जिवती 11
इतर ठिकाणच्या 15
एकूण 1135






नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.



About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!