महाराष्ट्र सामाजीक

सात वर्षात मोदी सरकारने देशाचे व जनतेचे वाटोळे केले :- आमदार प्रतिभाताई धानोरकर

चंदनखेडा (भद्रावती) :
एकीकडे महागाईने जनता होरपळत असताना भाजप सरकार दररोज महागाईचे चटके देत आहे, सत्तर वर्षात साडेतीनशे रुपये गॅस मिळत असताना महागाईचा डंबोरा पीटणाऱ्या भाजपा सरकारने सात वर्षाच्या काळात एक हजार रुपयांच्या वर घरगुती गॅस च्या किंमती वाढवून विक्रम केला असून स्वयंपाक घरातील भगिन्यांचे आर्थिक बजेट बिगघडविले आहे, याचबरोबर पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासह इतर वस्तूंच्या महागाईने सर्वसामान्यांची झोप उडविली आहे. याविरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने महागाई जन जागरण अभियानाची जोरदार सूरूवात वरोरा- भद्रावती निर्वाचन क्षेत्रातील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून चंदनखेडा या गावातून केली आहे.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाले की, सत्तर वर्षात काँग्रेसने काय केले, बहूत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या सात वर्षाच्या काळात मोदी सरकार ने देशात प्रचंड नुकसान केले. कोणत्याही वस्तूंच्या किंमती सर्व सामान्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत . आज देशातील गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचे गॅस, खाद्यतेल यासह सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून आपल्या व्यापारी मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना मरण यातना भोगायला लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकार ला वठणीवर आनन्यासाठी गाव असो शहर असो सर्व जनतेने पेटून उठले पाहिजे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार, गृहिणी, अशा सर्वच घटकांना या सरकारने त्रस्त करून सोडले आहे . केंद्र सरकारला जनतेच्या या लोकचळवळीची, आक्रोशाची दखल घ्यावीच लागेल आणि महागाई कमी करावीच लागणार असल्याचे सांगितले.

चंदनखेडा गावात शनीवारी रात्री 7.00वाजता पासून जन जागरण कार्यक्रमाची सुरुवात केली ‌.या अभियानात पथनाट्य ,भिमगीत, भजन, कीर्तन ,व्याख्यान आयोजित करण्यात आले.
भाजपा सरकारच्या विरोधात पेट्रोल ,डिझेल, घरगुती गॅस,खाद्यतेल महागाई विरोधात जन जागरण अभियान राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमांमध्ये आमदारांनी स्वतः भजन करून महागाई विरोधात सरकारचा निषेध नोंदवला. दूसर्यादिवसी. गावामध्ये प्रभात फेरी काढून भाजप सरकारचा महागाई जनजागृती करून वाढत्या महागाई विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.

चंदनखेडा या गावात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी एल्गार पुकारल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान भाजपला धक्का मिळण्याची शक्यता जोरदार आहे. भाजप सरकारच्या विरोधात हा एल्गार 14 ते 29 नोव्हेंबर 2019 पर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात वेगवेगळ्या गावांत निर्वाचन क्षेत्रातील आमदार किंवा खासदारनी रात्रभर ग्रामीण क्षेत्रातील उपक्रम राबवून करनार आहे. या अभियानात जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे नेते नाना पटोले त्यांनी केले आहे.

या जनजागरण अभियानात काँग्रेसचे भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती शहर अध्यक्ष सुरज गावंडे ,सुधीर मूळेवार , चंदन खेडा सरपंच , नयन जांभुळे तसेच भद्रावती तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!