उपव्यवस्थापक वानखेडे ह्यांच्या पुढाकाराने झाले कामावर रूजू
चंद्रपूर येथील महाऔष्णिक विज निर्मिती केंद्रात कार्यरत तीन कर्मचार्यांना सेवामुक्त करण्यात आले होते मात्र ह्या अन्यायाविरोधात तीनही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे दाद मागुन आपली बाजु यशस्वीरित्या मांडल्यामुळे अखेर मुंबई स्थित मुख्य कार्यालयाने सदर तीनही कर्मचार्यांना अर्ध कुशल कामगार ह्या अधिसंख्य पदावर नोकरीत सामावून घेण्याचे आदेश दिले असुन विविध वृत्त माध्यमातुन ह्या संदर्भात बातमी प्रकाशित झाल्यानंतर महा निर्मिती अधिकार्यांना खडबडून जाग आली व त्यामुळे ह्या तीनही कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय दुर झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, महाऔष्णिक विज केंद्रातील तीन कर्मचारी विकास सोनकुसरे, हेमंत बोकडे, रमेश सोनकुसरे ह्यांना मागील 16 महिन्यांपासून नोकरीत सामावून घेतले नव्हते त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता, मात्र माध्यमांनी ही बाब उचलुन धरताच ह्या तीनही कर्मचार्यांना उपव्यवस्थापक वानखेडे ह्यांनी बोलावून घेतले तसेच त्यांचे संपुर्ण कागदपत्रे तपासुन योग्य त्या निकषाप्रमाणे मुख्य कार्यालय मुंबई येथे कार्यवाही करिता पाठविले असता त्या तीनही कर्मचार्यांना तत्काळ सेवेत सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले असुन विकास सोनकुसरे, हेमंत बोकडे, रमेश सोनकुसरे ह्यांना अधीसंख्य पदावर सेवेत रूजू करून घेण्यात आले आहे.
तीनही कर्मचार्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतल्याबद्दल कामगार संघटना अभिनंदन केले असुन अधीसंख्य पदावर नियुक्ती मिळालेले विकास सोनकुसरे, हेमंत बोकडे, रमेश सोनकुसरे ह्यांनी सर्व वृत्त माध्यम तसेच उपव्यवस्थापक वानखेडे ह्यांचे आभार मानले आहे.

Add Comment