महाराष्ट्र सामाजीक

भर पावसात चिमुकल्यानी दिला ‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा ‘ चा स्केटिंग रॅली द्वारे संदेश

चंद्रपूर – 14/8 रविवार रोजी अमेया स्केटिंग क्लब चंद्रपूर, सुमित स्केटिंग अकॅडमी बल्लारपुर व शिवसेना शाखा चंद्रपूर ह्यांच्या संयुकक्त पणाने स्वातंत्र्य च्या 75 व्या अमृत महो्सवानिमित्त भव्य स्केटिंग रॅली चे आयोजन करण्यात आले.
ह्यात चंद्रपूर , बल्लारपूर येथील चिमुकल्यांनी पावसाची चिंता नकरता सहभाग नोंदविला.
रॅली ची सुरुवात रामनगर चोक ते वडगाव स्थित N.D हॉटेल व परत रामनगर चौक येथे संपन्न झाली. रॅली दरम्यान चिमुकल्यांनी भारत माता की जय व वंदे मातरम् ह्य जयघोषाने परिसर दमदुमन टाकला.
स्केटिंग रॅली नी चंद्रपूर वासियांना स्वतंत्र चे 75 वर्ष बद्दल स्थानिक लोकांमध्ये जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने रॅली काढली.

 

यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी पोस्टर आणि बॅनर प्रदर्शित करून सर्व नागरिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत आणि घरोघरी तिरंगा बद्दल जागृत करण्यात आले ! तसेच नागरिकांना ध्वजसंहिता ( Flag Code) बद्दल माहिती देण्यात आली.आम जनता द्वारे देशभक्तीच्या नारे देत टाळ्या वाजवून देशाच्या जवानांना आदरांजली ने गौरव केला.

ह्या रॅली दरम्यान शिवसेना जिल्हा अधक्ष्य संदीप गीरे,सुरेश पाचारे (नगरसेवक तुकुम ) स्थानिक लोकांना तिरंगा झेंडे वाटून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत माहिती दिली.

या रॅली मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गीरे, सुरेश पचारे, आतिश धूर्वे, सुमित बुटले,सागर हरणे, विशाल सर, राहुल मेहता , स्केटिंग प्रशिक्षक व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
रॅली चे समारोप रामनगर येथील शिवसेना कार्यालय येथे चिमुकल्यांना शिल्ड व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .

error: Sorry !! Content is Copyright protected !!