पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

घरफोडी करणारे आंतराज्यीय टोळी जेरबंद….

चंद्रपूर – दिनांक २३/०२/२०२२ रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथील फिर्यादी प्रदिप संदानंद चेपुरवार रा. राममंदिर जवळ, विवेकनगर, चंद्रपुर यांनी श्री गजानन महाराज प्रगटदिनाच्या दिवशी घरचे एक चांदीचा मोटा सिहांसन, दोन समया, एक चांदीचे छोटे सिहासन, एक चांदीची प्लेट, एक चांदीचा पाठ, एक चांदीची आरतीची प्लेट, दोन चांदीचा नंदा दिप, दोन चांदीचा नंदा दिप, दोन चांदीचा निरांजन, एक चांदीचा गुंड, एक चांदीचा छोटा ताट, दोन चांदीचे छोटे दिवे, दोन चांदीची छोटे वाट्या एक चांदीचा गौवरीचा डब्बा, एक संत गजानन महाराज यांची चांदीची मुर्ती असा एकुण ६५,००० /- रू. चा माल समोरील हॉल मध्ये पुजे करीता ठेवुन रात्री झोपले असता तरी अज्ञात चोराने • खिडकीचे ग्रिल काढुन आत प्रवेश करून चोरून नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे रामनगर येथे अप.क. १४९/२०२२ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये घटनास्थळा वरील प्राप्त फुटेज व तांत्रीक विश्लेषणातुन अज्ञात आरोपीतांची माहिती प्राप्त होताच पो.स्टे. चे डि.बी. पथकातील अधीकारी व कर्मचारी हे खाजगी वाहनाने बिड येथे रवाना झाले. गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा पाच दिवस व रात्रौ अतोनाथ परिश्रम घेवुन अज्ञात आरोपीतांची माहिती घेवुन जिल्हा जालना तसेच बिड येथुन आरोपी नामे १) आगामीर खॉन उर्फ लगडा लाला जहांगिर खॉन पठाण, वय – ३८ वर्ष रा. ढगे कॉलणी, बारशी नाका, बिड २) जमीर उर्फ काला जम्मु बनेमिया शेख, वय – ३८ वर्ष, रा. मोहमदीया कॉलणी, बिड यांना ताब्यात घेवुन खालील प्रमाणे गुन्हयात वापरलेली चार चाकी वाहन तसेच चोरीस गेलेला एक चांदीचा मोटा सिहांसन, दोन समया, एक चांदीचे छोटे सिहासन, एक चांदीची प्लेट, एक चांदीचा पाठ, एक चांदीची आरतीची प्लेट, दोन चांदीचा नंदा दिप, दोन चांदीचा नंदा दिप, दोन चांदीचा निरांजन, एक चांदीचा गुंड, एक चांदीचा छोटा ताट, दोन चांदीचे छोटे दिवे, दोन चांदीची छोटे वाट्या, एक चांदीचा गौवरीचा डब्बा, एक संत गजानन महाराज यांची चांदीची मुर्ती व गुन्हयात वापरलेली इंडिया विस्टा एम एच २४ व्ही. ४४०६ कि. २६०,००० असा एकुण अंदाजे किमंत ३,२५,०००/- रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद आरोपीतांवर जालना, बिड, औरगांबाद, तसेच इतर महाराष्ट्रातील जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे अनेक चोरी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत. सदर आंतराज्यीय टोळीस पकडण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सा., मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोनि राजेश मुळे, सा., सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पो. हवा. रजनीकांत पुठ्ठावार, अशोक मरसकोल्हे, पेतरस सिडाम, प्रशांत शेदरे, नापोशि/ पुरूषोत्तम चिकाटे, किशारे वैरागडे, विनोद यादव, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिष अवथरे, लालु यादव, पोशि विकास जुमनाके, संदिप कामडी, हिरालाल गुप्ता, मनापोंशि भावना रामटेके, मपोशि बुल्टी साखरे तसेच सायबर पोलीस ठाणे येथील नापोशि/प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, पोशि/ अमोल सावे यांनी केली आहे.

 

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!