चंद्रपूर जिल्हा घडामोडी महाराष्ट्र

जिवती, कोरपना व गोंडपिपरी नगरपंचायत आरक्षण सोडत 27 नोव्हेंबरला

chandrapur collector

चंद्रपूर दि.25 नोव्हेंबर : जिवती, कोरपना व गोंडपिपरी येथील नगरपंचायतीचे आरक्षण सोडत दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी निश्चित करण्यात येणार आहे. यासंबंधाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली असून प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.
जिवती नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी रोहन घुघे, कोरपना नगरपंचायती साठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जनार्धन लोंढे, तर गोंडपिपरी नगरपंचायतीसाठी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) प्रियंका पवार-कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली संबंधीत नगरपंचायत कार्यालयात दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता सोडत पद्धतीने जागा निश्चित करण्यात येतील.
तरी आरक्षण सोडतीच्या वेळी संबंधित नगरपंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!