चंद्रपूर– शासनाने नविन लादलेले २०१८ धोरण जिल्हा वृत्तपत्रांसाठी अन्यायकारक असून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एकंदरीत जाहिरातीत झालेला प्रभाव लक्षात घेता विशेषतः शासनाच्या विविध विभागाच्या दर्शनी जाहिराती ‘अ’ व ‘ब’ वृत्तपत्रांनाच देण्यात येतात. त्या पुर्ववत जिल्हा वृत्तपत्रांच्या अनेक तपांच्या सेवा पाहता जिल्हा वृत्तपत्रांनाही अग्रक्रमाने देण्यात याव्या तसेच ई-टेंडरिंगचा प्रघात त्यामुळे वृत्तपत्रांना निविदा सुचना व लिलावाचा जाहिराती चुकीची अंगीकारलेली पध्दत दुरूस्त करून प्रत्येक जाहिरात सबिस्तरपणे जिल्हा वृत्तपत्रांना देण्यात यावी
अनेक वर्षापासून पण शासनाच्या जाहिरात यादित समावेश नसलेल्या बृत्तपत्रांना विशेष बात म्हणून यादिवर घेण्यात यावे.
पोर्टल न्युज ना वृत्तसंकलनासाठी योग्य त्या सवलती तथा परिचयपत्र देण्यात यावे.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव व हलाखीची परिस्थिती पाहता व्दिवारषीक तपासणी २०२३ मध्येच करण्यात यावी. स्थानिक ईलेक्ट्रॉनिक्स मिडीयाला जे वार्ता प्रसिध्द करतात त्यांना निकषाप्रमाणे अधिस्विकृती पत्र देण्यात यावी. वृत्तपत्रामध्ये शासनाच्या बदलीच्या व जन समस्यांच्या वातचे कात्रण पुर्ववर्त जिल्हा माहिती कार्यालया मार्फत त्या त्या विभागांना पाठवावी अशी मागणी जागृत पाठक मंचानी केली आहे. उपरोक्त
मागण्या यथाशिघ्र विचारात घेण्यात याव्या ह्या साठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
Add Comment