पुंडलिक येवले
भद्रावती तालुका प्रतिनिधी
भद्रावती तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुधोली येथील सरस्वती विद्यालयात कोविड विलगीकरण केंद्राचे उद्घाटन आ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
ग्रामपंचायत मुधोली यांच्या पुढाकाराने व सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या या केंद्रात आॅक्सिजन सुविधायुक्त २५ खाटांची व्यवस्था करण्यात आली.
याप्रसंगी तहसीलदार महेश शितोळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱी डाॅ.मंगेश आरेवार, मुधोली ग्राम पंचायतीचे सरपंच बंडू पाटील नन्नावरे, सचिव नन्नावरे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक डोंगरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी गावचे सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच बंडू जी फुलकर, हनुमान राणे, माजी पो.पा.विष्णू पा. नन्नावरे,मुधोली प्राथ.स्वास्थ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांचा स्टाफ उपस्थित होता.
मुधोली सारख्या अतीदुर्गम भागात व तालुक्यापासून दूर असलेल्या परिसरात कोविड सेंटर ची फार आवश्यकता होती. ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल सर्वांनी आमदार प्रतिभाताईंचे आभार मानले व अडचणीच्या वेळेस असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुधोली येथे कोविड विलगीकरण केंद्र सुरु…


Add Comment