Breaking News चंद्रपूर जिल्हा घडामोडी

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर….

चंद्रपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागाकरीता संचारबंदीचे आदेश पारीत केले आहे.

अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली आहे.रविवारी अमरावती जिल्हात लॉकडाऊन पाळला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी रात्री आठ वाजल्यापासून हा लॉकडाऊन सुरू होणार असून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाउन रहाणार आहे. रविवारी जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा राहतील सुरू राहतील, अशी माहितीही अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.

असा असणार आहे यवतमाळमधील लॉकडाऊन?

शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र जमू नये. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसम्मेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका ई. करीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहता येईल. तसेच मिरवणूक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे.

लग्न समारंभाकरीता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्न समारंभ खुले लॉन, मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 व्यक्तींच्या मर्यादेत सामाजिक अंतराचे पालन करून रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी अनुज्ञेय राहील. लग्न समारंभाकरीता स्थानिक प्रशासन (तहसिलदार, मुख्याधिकारी व पोलिस विभाग) यांना माहिती देणे आवश्यक राहील.

20 पेक्षा जास्त व्यक्ती अंत्यविधी प्रसंगी एकत्र येणार नाही व सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे आढळून आल्यास स्थानिक प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे यांनी त्यांचे संस्थान, मस्जिद, मंदीर, चर्च व इतर धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

नागरीकांची गर्दी जिल्ह्यातील सर्व दुकानांमध्ये व बाजारपेठांमध्ये होणार नाही, याबाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत/ग्रमापंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच सर्व दुकाने, बाजारपेठ रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील याबाबत दक्षता घ्यावी.

जिल्ह्यातील इयत्ता 5 ते 9 पर्यंत सुरु असलेल्या फक्त नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दिनांक 28 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील.

या कालावधीत ऑनलाईन, दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील. खाजगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क, फेस कव्हर घालून असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलच्या आतमध्ये सुध्दा मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक राहील. याबाबतीत दर्शनी भागात बॅनर, फलक लावणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी.

सकाळी 8 ते रात्री 9.30 वाजेपर्यंतरेस्टारंट, हॉटेल सुरु ठेवण्यात मुभा देण्यात येत आहे. तसेच होम डिलेव्हरी करण्याकरीता रात्री 11.30 वाजेपर्यंत मुभा राहील. रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये दोन टेबलच्यामध्ये सामायिक अंतर (6 फुट) राखणे बंधनकारक राहील. अतिथी, ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स, मास्क, हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याकरीता पोलिस विभागाने बॅरेकेटस लावण्याची कार्यवाही करावी. रिक्षा चालक, खाजगी फोर व्हिलर, बसेस यामध्ये मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.

दंडात्मक कारवाई :

चेहऱ्यावर मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे इत्यादी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे प्रथम आढळल्यास 500 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 750 रुपये दंड, तिसऱ्यांदा व त्यांनतर आढळल्यास 1 हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई.

दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनाश्यक वस्तु विक्रेते इ. आणि ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे (दोन ग्राहकांमध्ये 6 फुट अंतर न राखणे विक्रेत्यांनी मार्कींग न करणे) याबाबत ग्राहक / व्यक्ती 200 रुपये दंड, आस्थापना मालक दुकानदार/विक्रेता 2 हजार रुपये दंड, त्यांनतर फौजदारी कारवाई करणे.

किराणा / जिवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावणे याबाबत 2 हजार रुपये दंड, त्यानंतर फौजदारी कारवाई, सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा – 2003 अंतर्गत 200 रुपये पर्यंत दंड, पहिला गुन्हा 1 हजार रुपये पर्यंत दंड किंवा 2 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हा 5 हजार रुपये पर्यंत दंड किंवा 5 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही राहील.

उत्पादकाकरीता पहिला गुन्हा 5 हजार रुपये पर्यंत दंड‍ किंवा 2 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही. दुसरा गुन्हा 10 हजार रुपये पर्यंत दंड किंवा पाच वर्षाची शिक्षा, विक्रेत्याकरीता पहिला गुन्हा 1 हजार पर्यंत दंड किंवा 1 वर्ष शिक्षा. दुसरा गुन्हा 3 हजार पर्यंत दंड किंवा 2 वर्ष शिक्षा.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!