गोंडपिपरी : तालुक्यातील वढोली गावातील करण गोंगले या दहा वर्षीय मुलाला हरणीया हा रोग जडला असता त्या व्याधीवर चंद्रपूर येथील नामांकित दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया पार पडल्या नंतर पुन्हा त्या करणला दुसऱ्या बिमारीने ग्रासले. त्यामुळे त्याच्या स्वादुपिंडा मध्ये छिद्र पडल्याचे उपचारादरम्यान निष्पन्न झाले. लहानशा वयात मोठ्या बिमारिने करणला ग्रासले, घरची परिस्थिती हालाकीची त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी त्याचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम नव्हते. मुलाचा उपचार करायचे कसे हा विचार संपुर्ण गोंगले कुटुंबियांना सतावू लागला.ही बाब काही पत्रकार बांधवांच्या लक्ष्यात येताच करण विषयी माहिती वृत्तपत्रांवर प्रसारीत करण्यात आली.
सदर वृत्तान्त मधील प्रकार येथील नामवंत व्यक्ती तथा समाज कार्यासाठी अग्रेसर आणि वेळेवर धावुन जाणारे महेंद्रसिंह चंदेल यांच्या लक्षात येताच. वेळ न दवडता संबंधीत आजारी मुलाच्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन भेट दिली आणि करण बद्दल सविस्तर माहिती जाणुन घेतली. गोंगले कुटुंबियांसमोरच नागपूर तसेच हैदराबाद मधील तज्ञ डॉक्टरांना फोन करून करणच्या आजाराबद्दल माहिती देत त्याच्यावर उपचार कसा करता येईल याची सविस्तर माहीती जाणुन घेतली. कोणत्याही परिस्थितीत करण चे उपचार करायचे म्हणजे करायचे हि तळमळ उराशी बाळगून करणच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा करुण दिला.
माहितीमध्ये करणवर शस्त्रक्रिया करावी लागेल तेव्हाच त्याची संपूर्ण बिमारी आटोक्यात येईल. शस्त्रक्रियेसाठी किमान चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येईल असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे होते. घरची परिस्थिती बेताची त्यामुळे इतका पैसा आणायचे कुठून हा गोंगले कुटुंबीयांसमोर एक यक्ष प्रश्न पडला,अश्या बिकट परिस्थितीत महेंद्रसिंह चंदेल यांनी सर्वत्तोपरी पुढाकार घेऊन करणच्या उपचारासाठी देवदूतासारखे धावुन आले. स्वतः आरोग्य विभागाशी संबंधित तज्ञ डॉक्टरांना परस्पर भेटुन करणच्या उपचारा विषयी संपूर्ण माहिती घेऊन समोरील आणि आवश्यक शस्त्रक्रियेसाठी नागपुर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केला. चांगले आरोग्य हेच आपले धन संपदा. पण कोणावर केव्हा, कधी आणि कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. अश्या संकट समयी जे धाऊन येतात तेच खरे “समाज कार्याचा वारसा”जोपासणारे असतात.
गोंगले कुटुंबियांची मुलासाठी होणारी धावपळ आणि मुलाची प्रकृती महेंद्रसिंग चंदेल यांना बघावल्या गेली नाही. हातावर आणणे आणि पानावर खाणे अश्या हालाकिच्या परिस्थितीत मुलाच्या उपचारासाठी होइल तितकी मदत करण्याचे आश्वासन दिला तसा पालन केला. नेहमीच सामाजिक बांधीलकी जपणारे अशी महेंद्रसिंह चंदेल यांची ख्याती आहे. करणच्या उपचाराची सर्वस्वी जिम्मेदारी घेत शेवटपर्यंत करणच्या पाठीशी टोकाची भुमिका घेऊन उभा राहीन,या पुढेही भविष्यात गरजूंना शक्य ती मदत माझ्याकडून केली जाईल, अशी माहिती महेंद्रसिंह चंदेल यांनी दिली.
Add Comment