कोरोना महामारीच्या नंतर मागील एक महिन्यापूर्वी शासनाने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली,पण शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी शासनाने कोणतीही बस सेवा पुरविण्याचा विचार केला नाही.
मागील एक महिन्यापासून अडेगाव- खातेरा- वेडद येथिल कित्येक शालेय विद्यार्थी हे खाजगी वाहनाने प्रवास करीत होते, खाजगी वाहनाने विद्यार्थ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत होता, तसेच खाजगी वाहनाने जीवघेणा प्रवास करावा लागत होता.हे सर्व लक्षात घेता मंगेश पाचभाई आणि काही विद्यार्थ्यांनी वणी येथे आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले त्या निवेदनाची दखल घेऊन अखेर वणी-अडेगाव-खातेरा बसफेरी सुरू करण्यात आली.
यावेळी अडेगाव येथे मंगेश पाचभाई आणि गावकऱ्यांनी चालकाचा तसेच वाहकांचा सत्कार केला.या बसफेरीचा खडकी-अडेगाव-खातेरा-वेडद येथील विद्यार्थ्या सर्व लाभार्थी आहे
Add Comment