चंद्रपूर : मृत तरुणीच्य हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे आणखी या प्रकरणाचे रहस्य वाढले आहे. या हत्येत आरोपींची संख्या किती, आरोपी कोणत्या जिल्ह्यातील आहे, हत्येमागे दुसरे कोणते कारण आहे, मृत मुलीचा रूममेटशी वाद असतानाही ती तिच्या बोलावण्यावरून चंद्रपूरला आली कशी, हत्येसाठी
भद्रावती शहरच का निवडले, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.
सहा दिवसानंतर आढळले शिर
भद्रावती येथे ४ एप्रिल रोजी निर्वस्त्र अवस्थेत शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. मागील सहा दिवसांपासून पोलीस ‘त्या’ युवतीचे शिर शोधत होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी इरई नदीपुलाखाली शिर व युवतीचे कपडे एका स्कार्फमध्ये गुंडाळून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आढळून आले. सहा दिवसांपूर्वी हत्या झाल्याने चेहरा खराब झाला आहे.
तिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने त्या घटनास्थळाची रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी कट रचून मृत युवतीला घटनास्थळी घेऊन गेले. त्यानंतर धारदार चाकूने तिचेे शिर कापण्यात आले. परंतु, पोलिसांनी तांत्रिक बाबींचा तपास करून या प्रकरणाचा छडा लावला आहे.
आठ पथकांद्वारे तपास
==================
भद्रावतीला निर्वस्त्र मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ माजली. या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी उपविभागातील पाच व स्थानिक गुन्हे शाखेची तीन अशी आठ पथके तयार केली. सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपीला अटक केली आहे.
Add Comment