चंद्रपूर जिल्हा घडामोडी

पूरात अडकलेल्या 22 जीवांचे सतर्कतेने प्राण वाचविल्याबद्दल मयुर मोरे यांचा ‘इरा’ तर्फे सत्कार

परभणी : दि. 11 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अडकलेल्या 7 पुरुष, 5 स्त्रीया व 10 शेळ्या यांचे सामाजिक कार्यकर्ते, तथा तरुण पत्रकार मयुर मोरे (देशमुख) यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहेत.
येथील सा. जनआक्रोशचे संपादक तथा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे परभणी शहराध्यक्ष मयुर मोरे यांना मिरखेल जवळील पिंगळगड नदीला रविवारी झालेल्या अतिवृष्टीने पूर आल्यामुळे, शेतामध्ये गेलेले शेतकरी, शेतमजूर पूराच्या पाण्यात अडकून पडले. नदीच्या पाण्याचा ओढा वाढत असल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.



याची माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, परभणीचे तहसीलदार बिरादार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना तत्परतेने फोन करुन पूरामध्ये अडकलेल्यांसाठी मदतीची मागणी केल्याबरोबर शासन यंत्रणेने मदतीची सुरुवात केली. मध्यरात्री बोटीद्वारे अडकलेल्या शेतकर्‍यांची व शेळ्यांची सुटका करुन त्यांचे प्राण वाचविले.



मयुर मोरे यांच्या सतर्कतेमुळे 12 जीवांचे प्राण वाचल्याबद्दल इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे परभणी जिल्हाध्यक्ष मदन कोल्हे, परभणी मिडीया चिफ देवानंद वाकळे, सा. लोकसन्मानचे संपादक मंचक खंदारे, सा. विठोबाचे प्रविण मोरे यांनी मयुर मोरे यांचा सत्कार करुन अभिनंदन केले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!