Breaking News

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

आवळगांव
नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी. परीक्षेच्या निकालात महाराष्ट्र विद्यालय,आवळगाव तालुका:- ब्रम्हपुरी या शाळेचा निकाल ९६% लागला असून विद्यालयात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती पुरस्कार वितरणा चा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री व्हि.बि.आडे यांनी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून
विद्यालयातून प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी वंशिका वासुदेव नरुले,
प्रेरित जयप्रकाश भावे ,कुमारी अनुराधा खेमराज उरकुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव व अभिनंदन केले .
तसेच २०२०/२१या वर्षात
विद्यालयातून प्रथम आलेला विद्यार्थी प्रज्वल शिशिर चौधरी याला राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्काराचे रुपये पाच हजाराचा धनादेश देऊन त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील शिक्षक श्री साखरे ,भावे ,तालान,येलके, अमरदीप लोखंडे, रोहनकर सुखदेवे, राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इरपाते सर यांनी तर आभार श्री तालान सर यांनी मानले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!