चिमूर:- चिमूर नगर परिषद चे प्रभाग निहाय आरक्षण पडले असताना अनेक इच्छुक उमेदवार कामास लागले असून त्यात विशेष म्हणजे प्रभाग 2 ओबीसी महिला राखीव झाल्याने भाजप कडून सौ सविता सुरज नरुले यांनी सुद्धा दावेदारी करीत त्या कामास लागल्या आहे
सौ सविता नरुले यांचे पती हे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे खंदे समर्थक असून ते आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रत्येक कार्यात आघाडी वर राहत असून त्यांनी आपल्या प्रभागात रस्ते,नाली व पाणी समस्या सोडवण्यासाठी नप प्रशासन ला धारेवर धरून सोडावीत आहे .
प्रभाग 2 ओबीसी महिला राखीव असल्याने सुरज नरुले यांनी आपल्या पत्नीला समोर करून भाजप कडून नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्याची दावेदारी करीत असून परंतु आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा अखेरचा शब्द पाळल्या जाईल आणि त्याच्या आदेशाचे पालन केले जाणार असल्याचे सुद्धा नरुले नी सांगितले.
Add Comment