सायंकाळी सहा चा सुमारास वस्ती विभाग आंबेडकर वॉर्ड इथे दिवस ढवळ्या मृतक राकेश दर्शन बहूरीया वय 37 आपल्या ऍक्टिव्हा गाडी वरून येत असताना गल्लीत लपून असलेले आरोपी यांनी तलवारीने मृतक चा गळ्यावर वार करून गळा कापून जाग्यावरच हत्या करण्यात आली, मृतक चा गळ्यातून रक्ताची धार वाहून जाग्यावरच दम सोडला.
मृतक व आरोपी आपसी संबंधित आहे, वराह(डुक्कर)पकडण्याचा वादातून हत्या करण्यात आली असे बोलल्या जात आहे, हत्या करणारा एका आरोपीला काही वेळातच पोलिसांनी अटक केली आहे एक आरोपी फरार झाला आहे, पोलिसांनी मृतक चा पंचनामा करून शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले. पुढील तपास बल्लारपुर पोलीस करीत आहे.
Add Comment