महाराष्ट्र सामाजीक

राष्ट्रीय रोलर बास्केटबॉल स्पर्धते तनिशा उमाळेचे सुयश …

चंद्रपूर – नुकत्याच संपन्न झालेल्या पाचव्या राष्ट्रीय रोलर बास्केटबॉल स्पर्धेत तनिशा ही स्वर्ण पदकाची मानकरी ठरली.

पाचवी राष्ट्रीय रोलर बास्केटबॉल स्पर्धा २८/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ दरम्यान चंदिगढ येथे यशस्वी रित्या पार पडली.या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने ४ स्वर्ण आणि २ रजत पदक पटकावले.यात विविध वयोगटातील ९ राज्यातून खेळाडू सहभागी झाले होते
याच स्पर्धेत चंद्रपूरच्या तनिशा नागेश उमाळे हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या महाराष्ट्र संघासाठी सुवर्ण पदक पटकावले. तनिशा माउंट कॉर्मेल कॉन्व्हेन्ट हायस्कूल ची ७ व्या वर्गातील विद्यार्थिनी आहे.ती मागील सहा वर्षांपासून स्पीड स्केटिंग करत आहे.याआधी तिने जिल्हास्तरीय , विदर्भ स्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदके पटकावले आहेत.तिच्या सातत्यपूर्ण कामगिरी ने तिची निवड राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली.त्यात तिने घवघीत यश संपादन केले.
तनिशा आपल्या यशाचे श्रेय आपले प्रशिक्षक श्री सोनी सर आणि आपले पालक यांना देते.
तनिशा च्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!