चंद्रपूर -शहरातील इंदिरानगर भागात अवैध धंदे करणाऱ्या शिवसैनिक विक्रांत सहारे आणि पवन नगराळे यांनी काल रात्री 11.30 वाजता चंद्रपूरचे tv9 प्रतिनिधी निलेश डाहाट यांना बेदम मारहाण केली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सहारे जिल्हा युवासेना समन्वयक आहे. इंदिरानगर भागात देशोन्नती प्रतिनिधी विनोद बदखल आणि डाहाट गप्पा करत होते. तेव्हा सहारे-नगराळे यांनी तेथे पोचत अवैध धंद्यांची बातमी प्रकाशित केल्यावरून वाद केला. तो शांतही झाला. मात्र घटनास्थळावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या डाहाट यांचा सहारे-नगराळे जोडीने पाठलाग करून त्यांना रामबाग वसाहत वळणावरील मूल मार्गावरच्या माता मंदिराजवळ थांबवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावरील बांधकामाचे गट्टू त्यांना मारण्यात आले. शस्त्राचा आणि चाकूचा धाक दाखविला गेला. मदतीसाठी काही लोक थांबले तेव्हाच आरोपी पसार झाले. या घटनेत डाहाट यांना पोट-पाठीवर जबर गुप्त मार लागला आहे. सोबतच ओठ फाटल्याने टाके बसले आहेत. उपचार सुरू आहे.
चंद्रपूर येथील Tv 9 चे प्रतिनिधी निलेश डाहाट यांना बेदम मारहाण….
December 27, 2021
244 Views
1 Min Read


You may also like


लोकवाचक न्यूज
श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959
Add Comment