महाराष्ट्र सामाजीक

माजरी रेल्वे सायडिंगवरील अतिक्रमण हटविण्याची लोकांना नोटीस…. नागरिकांत खळबळ : रेल्वे प्रशासनाची मनमानी

माजरी -रेल्वे सायडिंगजवळ माजरी येथे राहणाऱ्या नागरिकांना घर व दुकाने हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता या लोकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने जनतेत प्रचंड नाराजी आहे. या रेल्वे परिसरातील रहिवाशांची घरे व दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. रेल्वे प्रशासनाला मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप येथील जनतेने केला आहे. मध्य रेल्वेचे अभियंता पद्मनाथ झा यांनी पुन्हा 17 जणांना नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय, राज्य सरकारच्या मदतीने घरे रिकामी करू अन्यथा 14 मे रोजी घरे पाडू, असा इशारा दिला आहे.
यापूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी माजरी येथील घर किंवा दुकान पाडल्यास रेल्वेवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. वेकोलि माजरी परिसरात रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला 50 वर्षांपासून शेकडो कुटुंबे वास्तव्यास व व्यवसायात आहेत. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व शेकडो कुटुंबांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात आंबेडकर वॉर्डातील रहिवासी, तेलुगु दफाई, एलसीएच, झेंडा दफाई, सिद्धार्थ वॉर्डातील रहिवासी आणि दुकानदार यांना घरे व दुकाने हटविण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. आता रेल्वेने पहिल्या टप्प्यात 17 लोकांना नोटीस दिली असून माजरी येथे रेल्वे प्रशासन पोलिसांची मदत घेऊन लोकांची घरे पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!