चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले
आज दि.१२/०४/२०२१ रोज सोमवार ला चिमूर तालुक्यातील भीसी, शंकरपूर, नेरी, मासळ या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आमदार श्बंटीभाऊभांगडीया यांच्यातर्फे पी.पी.ई किट्स तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या.
चिमूर तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये, यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी आधीच खबरदारी घेत आपल्या कार्यकर्त्यांमार्फत आरोग्य प्रशासनाला आवश्यकतेनुसार मदत पुरविण्यात येत आहे.
आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते सुद्धा काळजीपूर्वक लक्ष ठेवून गरजेनुसार नागरिकांना मदत पुरवीत आहेत. त्यातच आज प्राथमिक आरोग्य केंद्रावर पी.पी.ई किटचा तुटवडा पडू नये, व आरोग्य यंत्रणेला कोरोनापासून बचाव करता यावा, व त्याच्या वेगाने होत असलेल्या प्रसाराला रोखण्याकरिता आधीच दक्षता घेत कार्यकर्त्यांना तात्काळ सूचना देत पी.पी.ई किट उपलब्ध करून देण्यात आल्या.
आमदार साहेबांच्या सूचनेनुसार चिमूर येथील जनसंपर्क कार्यालय प्रमुख विक्की कोरेकार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भीसी,शंकरपूर,नेरी,मासळ या आरोग्य केंद्रांवर पोहचून सर्व पी.पी.ई किट्स आरोग्य अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आल्या.यावेळी किशोर मुंगले, प्रदीप कामडी, अनिल शेंडे, आसिफ शेख, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment