160 पोलीस , पाटील , तसेच नव युवकांनी केले रक्तदान ….
शेगांव बू – प्रतिनिधी ..मनोज गाठले …
स्थानिक शेगाव बू येथे आज पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..
तर या रक्तदान शिबिरा ला येथील पोलीस , पोलीस पाटील संघटना , तसेच युवक वर्गांची या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद देऊन रक्तदान केले …
विशेष म्हणजे आज ही ग्रामीण भागात रक्तदान करण्याकरिता नागरिक घाबरतात व रक्तदान विषयी विविध प्रकारचे टीका टिप्पणी करतात पण मात्र आज युवक तसेच जनतेचा आक्रोश पाहून युवक मोठ्या संख्येने रक्तदान करण्यास आतुर होते तर काही युवकांना आल्या मार्गी परत जावे लागले तर आज चिमूर स्टेशन येथे झालेल्या रक्तदान शिबिर ला ही मागे पाडून आज 156 युवकांनी रक्तदान केले हे मात्र कौतुकास्पद बाब असल्याने सर्व युवकांचे आभार मानून त्यांना भेट वस्तू सह , प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला…
विशेष म्हणजे हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे . तसेच सहा.पोलीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे . यांच्या मार्गदर्शनात श्री नितीन बगाटे sdpo चिमूर यांच्या संकल्पनेतून येथील ठाणेदार श्री सुधीर बोरकुठे , श्री प्रवीण जाधव .asi श्री महादेव सरोदे. Asi .यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम घेण्यात आला .. या कार्यक्रम साठी शेगांव स्टेशन चे कर्मचारी तसेच पोलीस पाटील तसेच नव युवकांनी मोलाचे सहकार्य केले .
Add Comment