चंद्रपूर जिल्हा घडामोडी

भद्रावती-वरोरा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थापनासाठी एक कोटीचे नियोजन

One crore planning for health management in Bhadravati-Warora taluka

भद्रावती येथील आढावा बैठकीत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची माहिती

पुंडलिक येवले
(भद्रावती तालुका प्रतिनिधी)

भद्रावती तथा वरोरा तालुक्यातील सध्याची कोरोना प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेता या दोन्ही तालुक्यातील व्यवस्थापनासाठी आमदार निधीतून एक कोटीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भद्रावती नगर परिषद कार्यालय येथील अधिकाऱ्यांसोबत दि.२१ ला घेण्यात आलेल्या एका आढावा बैठकीतून आ.प्रतिभा धानोरकर यांनी दिली.



सदर बैठकीला खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बैठकीत स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी भद्रावती तालुक्यातील आरोग्य स्थितीची माहिती देऊन तुटवडा असलेले विविध साहित्य द्यावे अशी मागणी केली. त्यात ग्रामीण भागातील कोविड प्रभावित रुग्णांना उपचारासाठी शहरातील उपचार केंद्रावर स्थानांतरित करण्यासाठी एका स्वतंत्र वाहनांची मागणी करण्यात आली.



याशिवाय कार्गींन मशीन मोठे व लहान स्वरूपाचे आक्सिजन सिलेंडर, एक हजार पीपीई किट, ऑक्सिमिटर, एन 95 मास्क, ७ हजार हॅन्डग्लोज तथा इतर साहित्याची गरज असून त्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या सर्वाचे नियोजन करून तालुक्यात कोणत्याही प्रकारचे आरोग्य विषयक साहित्याची कमतरता पडणार नाही असे आश्वासन यावेळी प्रतिभा धानोरकर यांच्याकडून देण्यात आले.याशिवाय तालुक्यातील कोविड रुग्णांची पूर्ण व्यवस्था व उपचार तालुका पातळीवरच करावी अशा सूचना यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.त्यासोबतच कोणत्याही नागरिकांनी घाबरून जाऊ नये मी सैदव आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले.



सदर बैठकीला तहसीलदार महेश शितोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिंग, डॉ. नितीन सातभाई आणि विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कोविड उपचार केंद्रावर जावून खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्राची पाहणी केली. तेथील परिस्थिती जाणून घेतली व रुग्णांची विचारपूस केली.


About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!